संगीताताई लातूरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे सुषमाताई अंधारे यांच्या हस्ते उदघाटन..

 संगीताताई लातूरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे सुषमाताई अंधारे यांच्या हस्ते उदघाटन..




हमीभाव, विम्याचे पैसे, बचत गटांच्या मालासाठी बाजारपेठ मिळवून देण्याला प्राधान्य- संगीताताई लातूरकर.


औसा प्रतिनिधी 


औसा - शिवसेनेच्या फायर बॅण्ड उपनेत्या श्रीमती सुषमाताई अंधारे यांच्या हस्ते संगीताताई लातूरकर यांच्या औसा तालु‌का जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन झाले. यावेळी शिवसेना उपनेत्या स्मिताताई गायकवाड, संपदा वाडीकर जिल्हा संपर्कप्रमुख संघटक, जिल्हाप्रमुख दिनकररावजी माने साहेब.


सह संपर्कप्रमुख संतोष सोमवंशी, जिल्हा उपप्रमुख बजरंग दादा जाधव,, जिल्हा संपर्कप्रमुख सुनीलजी वेनुगुलकर, राजूभाऊ साळुंके, मोहन तात्या माळी, युवराज यादव, प्रशांत कुलकर्णी, ओम प्रकाश डुमणे, अंगद सूर्यवंशी, लिंबराज लोणारे, रतन वरवटे, खंडू शिवारे, परमेश्वर राठोड यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी राज्यात जनसंवाद यात्रा काढली आहे. त्यांची ही यात्रा आज औसा तालुक्यात पोचली. औसा शहरात प्रवेश करताना या फटाक्याची आतषबाजी करत व फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत यात्रेचे जंगी स्वागत शिवसैनिकांनी केले. या स्वागतानंतर औसा शहरात रॅली काढण्यात आली.


ही रॅली उदय पेट्रोल पंपावर आली. तेथील हाश्मी कॉम्प्लेक्स मध्ये संगीताताई लातूरकर यांनी जनसंपर्क कार्यालय सुरु केले आहे. या जनसंपर्क कार्यालयाचे औपचारिक उदघाटन शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी करून ते जनतेसाठी खुले केले. यावेळी बोलताना संगीताताई लातूरकर यांनी सांगितले की, सोयाबीनला हमीभाव मिळवू देण्यासाठी प्रयत्न, अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्यासाठी


प्रयत्न करणे, पिक विमा वेळेवर मिळवून देण्यासाठी, शाश्वत पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी, बचत गटांचा माल बाजारापर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करणे याला आपल्या कामात प्राधान्य असेल.


सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधांनी युक्त असे हे कार्यालय असेल. इथे नागरिकांच्या सोयीसाठी व त्यांना मदत करण्यासाठी शिवसैनिक असतील. या संवाद यात्रेत अंधारे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसेच महिला शिवसैनिकांना मेळाव्यात मार्गदर्शन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या