मनसेने कृषी उत्पन्न बाजार समितीचा सौदा उधळला ..

 मनसेने कृषी उत्पन्न बाजार समितीचा सौदा उधळला ..



औसा प्रतिनिधी

 औसा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्याचा सर्वच माल हमीभावाने खरेदी करावा. तसेच पायली,कडता,मातेरं च्या नावाखाली शेतकऱ्याची होत असलेली लूट थांबवावी या मागणी करीता मनसे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सौदा उधळला.औसा  कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा कमी भावाने शेतीमालाची खरेदी - विक्री व तसेच पायली, कडता,मातेरं,च्या नावाखाली होत असलेली लूट थांबवावी. व औसा बाजर पेठेतील पायली कडता मातेरं बंद करावी.या मागणीसाठी औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांना मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी विधानसभा संघटक महेश बनसोडे, तालुका अध्यक्ष मुकेश देशमाने, शहराध्यक्ष प्रवीण कठारे, शहर संघटक अमोल थोरात, जिल्हा सचिव धनराज गिरी, तालुका संघटक राजेंद्र कांबळे, युवराज आळणे, तानाजी गरड, गोविंद चव्हाण, गुणवंत लोहार, जीवन जंगाले, प्रवीण पोतदार, विकास लांडगे, विवेक माहूरकर, बाळू सोलाणे, प्रवीण खडके, अमोल परिहार, नवनाथ माचवे, अभिजीत कठारे आदि कार्यकर्ते पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे व संतोष हुच्चे यांनी लेखी पत्र देवून आगामी काळात शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाही याची दखल घेऊ व पायली कडता घेत असल्याचे निदर्शनास आल्यास व्यापा-यावर कार्यवाही करु असे आश्वासन दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या