सुषमा अंधारे यांची उपोषणस्थळी भेट
औसा प्रतिनिधी
सोयाबीनला किमान ८५०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव द्यावा, गतवर्षीच्या खरीप हंगामातील पीक विमा तात्काळ द्यावा, शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करावी. अशा प्रमुख मागण्यांसाठी अ.भा. छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे पाटील यांनी औसा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आजचा 12 वा दिवस आहे. दरम्यान या उपोषणाला रविवारी उबाठा शिवसेनेचे उपनेत्या सुषमा अंधारे यांनी औसा विधानसभा महिला -गटप्रमुख मेळावा कार्यक्रमात आले असता त्यांनी उपोषणस्थळी भेट दिली.यावेळी त्या म्हणाल्या शासनानी या उपोषणाची दखल घेतली पाहिजे,पण म्हणावी तशी दखल घेतली जात नाही.पण माझं विजय भैय्या कडे लक्ष असे त्यांच्या दृष्टीकोनातून आपण फार अपेक्षा करु नये आणि विनाकारण आपली हालही करून घेऊ नये कारण आता महायुतीला खरच जाहिर करायचं असतं तर त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत केव्हाच जाहीर केले असते.आज तब्बल 29 तारीख आहे.फार काही नाही किमान चार आठ दिवसात आचारसंहिता लागत आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अतिवृष्टीचा फटका बसलेल्या लोकांची नुकसान भरपाई केली जात नाही किंवा पिकविमा अनुदान चे प्रश्न प्रलंबित आहेत शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव विशेषतः सोयाबीन ला भाव नाही याकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. आपली प्रकृती खालावली आहे तरी आपण आपली हाल अपेष्टा करुन घेऊ नये. कारण जान है तो जहान है .मी बहिण या नात्याने सांगत आहे आपण उपोषण सोळावे.असे यावेळी बोलत होते.या उपोषणस्थळी माजी आमदार दिनकर माने, बजरंग जाधव, संतोष सोमवंशी,संगीताताई लातुरकर, संजय उजळांबे,आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या