"जिल्हा क्रीडाअधिकारी लकडे साहेब यांनी केला योगीता व अनुरागचा सत्कार"...
.
औसा प्रतिनिधी श्री संत तुकाराम इंटरनॅशनल मॉडेल इंग्लिश स्कूल लातूर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय *'50 मिटर फ्री स्टॉईल जलतरण'* स्पर्धेमध्ये *श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय किल्लारी* येथील विद्यार्थिनी कु. योगिता नेताजी सावंत (11विज्ञान) या विद्यार्थ्यांनीने 19 वर्ष वयोगटातून प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्तरावर निवड झालेली आहे. तसेच योगीताचा भाऊ अनुराग सावंत यांनी जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेबद्दल अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभलेले, अंतरराष्ट्रीय खेळाडू , लातूरचे *जिल्हा क्रीडाअधिकारी आदरनिय मा. श्री जगन्नाथजी लकडे साहेब यांनी सावंत बहीण -भावास बुके व 1000/( एक हजार रुपये) नगदी रोख रक्कम प्रोत्साहनपर देऊन पेढे भरवून अभिनंदन व कौतुक केले. तसेच योगीताचे क्रीडाशिक्षक प्रा. बी.एम.शिंदे सरांचे व सोनवणे सरांचेही कौतुक केले. व विभागीय स्पर्धेसाठी दोघानांही शुभेच्छा दिल्या. यावेळी पतंजली योग समिती लातूरचे सर्वेसर्वा तथा अनुरागचे आद्य योगगुरु योगाचार्य मा. विष्णुजी भुतडा साहेब, क्रीडाअधिकारी मा.चंद्रकांतजी लोदगेकर साहेब, मा.लटके साहेब, मा. कृष्णा केंद्रे साहेब, क्रीडा अधिकारी बावणे धिरज साहेब, खो - खोमध्ये *शिवछत्रपती पुरस्कार* प्राप्त -
*
औसा तालुका क्रीडाअधिकारी श्रीमती सारीका काळे मॅडम , हनुमान विद्यालय शिवलीचे माजी मुख्याध्यापक तथा क्रीडाप्रेमी जे सेवानिवृत्तीनंतरही सतत खेळाडूंना प्रोत्साहन , सहकार्य व मार्गदर्शन करतात असे मा.श्री. संदीपानजी माळी सर , योगीताचे प्रशिक्षक मा.प्रा. बी. एम.शिंदे सर , अनुरागचे प्रशिक्षक Ad.मा.महादेवजी झुंजे पाटील, पालक श्री नेताजी सावंत तसेच जिल्हा क्रीडा संकुल कार्यालयातील पूर्ण स्टॉप उपस्थित होता. सर्वांच्या वतीने अभिनंदन करून पुढील विभागीय जलतरण व योगा स्पर्धेकरीता बहीण - भावास शुभेच्छा देण्यात आल्या.
0 टिप्पण्या