*"आदिज् लोर अबॅकस & फोनिक्स अकॅडमी "चा पालक मेळावा संपन्न*
औसा प्रतिनिधी -औसा येथील श्री. वैभव पाटील व सौ.प्रज्ञा पाटील यांनी *लोर अकॅडमी (अबॅकस) सोलापूर* यांच्या अंतर्गत *आदिज् लोर अकॅडमी,औसा* सुरुवात केली यांचा पालक मेळावा दिनांक 31/ 08 /2024 रोजी श्री मुक्तेश्वर प्राथमिक विद्यालय, औसा येथे संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून औसा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.काशिनाथ सगरे सर, मार्गदर्शक म्हणुन लोर अकॅडमी चे एम.डी. राहुल माने सर,शशांक भोसले सर संचालक सोलापूर ब्रांच, वैष्णवी पाटील मॅडम संचालिका लातूर ब्रांच, अंजली माने मॅडम संचालिका लोर अकॅडमी सैफुल, सोलापूर, आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी मोठ्या प्रमाणात पालक विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोर अकॅडमीचे सर्व सन्माननीय सदस्य यांनी खूप परिश्रम घेतले. या कार्यक्रमात आदिज् लोर अकॅडमी ची चार वर्षांची वाटचाल दाखवली.सर्वात लक्षणीय भाग होता तो म्हणजे विद्यार्थ्यांचे डेमो, या मधे अतिशय जलद गती ने विचारल्या गेलेल्या गणितीय प्रक्रिया (अंकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार भागाकार आणि दशांश) ची उत्तरे विद्यार्थ्यांनी वेगवान आणि अचूक दिली.
0 टिप्पण्या