मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त व शहरातील नाली गटारे काढुन धुर फवारणी करा-सय्यद मुजफ्फर अली इनामदार
औसा प्रतिनिधी
औसा शहरात व परिसरात कुत्र्यांची होत असलेले वाढ ही शहरातल्या नागरीकांसाठी खुप मोठी समस्या झाली आहे. मोकाट कुत्र्यांपासुन लहान मुलांना जिवीतास धोका निर्माण झाला आहे व रात्री उशीरा जर बाहेर पडायचे असेल तर मोकाट कुत्र्यांचे मोठे झुंड अंगावर येत आहेत व चावा घेत आहेत. याबाबत आम्ही दि. १८/०६/२०२२ रोजी निवेदन दिलेले होते तसेच याबाबत मा. खा. ओमराजे निंबाळकर यांनी पत्राद्वारे आपणास सुचित केले होते. परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
तसेच शहरात नाली व गटारे तुडुंब भरले आहे. विशेषतः जलालशाही चौक ते औटी गल्लीपर्यंतची नाली नेहमी भरत असते. यामुळे नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तसेच पावसामुळे मच्छर मोठ्या प्रमाणात झालेले आहे. तसेच धुर फवारणी करणे गरजेचे आहे.
तरी शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करण्यात यावा तसेच नाली व गटारातील गाळ काढुन धुर फवारणी करण्यात यावी. अन्यथा एम.आय.एम. च्या वतीने नगर पालिकेवर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
0 टिप्पण्या