राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष भरत सुर्यवंशी यांनी शिवस्वराज्य यात्रेचे स्वागत करत केले जोरदार शक्तीप्रदर्शन..
औसा प्रतिनिधी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी
किल्ल्याच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन महाराष्ट्रात
रयतेचे राज्य आणण्याचा निर्धार करत आदरणीय शरद
पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली
आहे.
महाराष्ट्रावर होत असलेला अन्याय आणि.
महाराष्ट्राविरुद्ध रचण्यात आलेला कट लोकांसमोर
आणण्याचं काम व पक्षाची भुमिका लोकांपर्यंत
पोहचवण्याचा प्रयत्न या यात्रेच्या माध्यमातून करण्यात
येणार आहे.
काल लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघात
यात्रा आली असता राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार
पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष भरत भाऊ
सुर्यवंशी यांच्या वतीने प्रांताध्यक्ष आदरणीय जयंत
पाटील साहेब, संसदरत्न खा. सुप्रिया ताई सुळे, खासदार
डॉ. अमोल कोल्हे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब भाई शेख,
विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील दादा गव्हाणे यांचे लामजना
पाटी येथे भव्य असा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी
मान्यवरांनी उपस्थित जनतेला संबोधित करून आगामी
विधानसभा निवडणूकी मध्ये महाविकास आघाडी च्या
उमेदवाराला विजयी करण्याचे आव्हान केले.
यावेळी युवक जिल्हाध्यक्ष भरत भाऊ सुर्यवंशी, जिल्हा
कार्याध्यक्ष रशीद सर शेख, माजी तालुकाध्यक्ष जीवनराव
पाटील, दिलिप लोहार, सुभाष दाजी पवार, योगिराज
काका पाटील, तालुकाध्यक्ष शाम आबा पाटील,
विधानसभा अध्यक्ष यशवंत भोसले, महिला तालुकाध्यक्ष
सुनिता भोसले, युवक तालुकाध्यक्ष बाळासाहेब
जाधव, युवक कार्याध्यक्ष वसीम बोपले, युवक विधानसभा अध्यक्ष अशोक गरड, आत्माराम साळुंखे,विनोद झिरमिरे, रोहन जाधव, निशांत पाटील, शिराज
शेख, रवी सुर्यवंशी, शाम कदम, पाशा शेख, कृष्णा
साळुंखे, कालिदास डांगे, रामजी सुर्यवंशी, अजय चाबुस्वार, समीर पठाण, किसन भांगे, व प्रमुखपदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते...
0 टिप्पण्या