मुख्यमंत्री लाडकी बहिण समितीच्या अध्यक्षपदी भाग्यश्री यादव..
औसा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा पवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये मानधन देण्याचा महत्त्वकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे या योजनेचे राज्यभरातील महिला वर्गातून उत्स्फूर्त स्वागत होत असून महिलांना दिलासा मिळाला आहे. ही योजना तळागाळातील महिला भगिनीपर्यंत प्रभावीपणे राबविता यावी म्हणून औसा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या शिफारशीवरून मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजना समितीच्या औसा तालुका अध्यक्षपदी भाग्यश्री निळकंठ यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर अशासकीय सदस्य म्हणून शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा शहर प्रमुख बंडू उर्फ व्यंकटेश रामचंद्र कोदरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते दत्तात्रेय कोळपे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्ष व अशासकीय सदस्यांच्या नियुक्ती बद्दल औसा तालुक्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
0 टिप्पण्या