औसा येथे सकल ओबीसी समाजाची बैठक संपन्न
औशात लवकरच भव्य एल्गार ओबीसी मेळावा
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यातील सकल ओबीसी समाजाच्या वतीने औसा येथे ओबीसी समाजाच्या विविध प्रकारच्या मागण्या संदर्भात रविवारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
याबाबतीत सविस्तर माहिती अशी की, औसा तालुक्यातील ओबीसी समाजाची संख्या लाखांच्या वरी असून ओबीसी समाज एकत्र आला तरच औशांत ओबीसी समाजातील नेतृत्व उभे राहण्यासाठी वेळ लागणार नाही.त्या निमीत्ताने लवकरच सकल ओबीसी समाजाच्या वतीने औसा येथे भव्यदिव्य असा एल्गार मेळावा आयोजित करण्यात येणार असून त्या अनुषंगाने नियोजन बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीसाठी जिल्हाभरातील प्रमुख समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यामध्ये मेळाव्याच्या अनुषंगाने विविध विषयांवर सर्वानुमते विचार विनिमय करण्यात येऊन नियोजन करण्यांचे ठरविण्यात आले. यामध्ये कोर कमिटीची स्थापना करणे, गावनिहाय ओबीसी शाखा स्थापन करणे, समाजातील प्रत्येक ओबीसी बांधवास कमिटी मध्ये स्थान देणे, गावनिहाय भेटीगाठी चे नियोजन करणे.एल्गार मेळाव्याच्या निमित्ताने कोणा कोणाला निमंत्रण द्यायचे, सर्कल निहाय ओबीसी बांधव यांची कार्यकारिणी करणे, मेळाव्याचे ठिकाण ठरवणे यासह अनेक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.असून लवकरच ओबीसी नेते यांच्याशी विचारविनिमय करून मेळाव्याची तारिख जाहिर करण्यात येईल असे बैठकीत ठरविण्यात आले.याप्रसंगी समाजातील विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.या बैठकीसाठी औसा तालुक्यासह जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.
0 टिप्पण्या