भिम आर्मी मराठवाडा समीक्षा बैठकीस सर्व पदाधीकारी कार्यकर्ते यांनी हजर रहावे.... विनोद कोल्हे
लक्ष्मण कांबळे:- लातूर प्रतिनिधी
भिम आर्मी संस्थापक अध्यक्ष खासदार भाई चंद्रशेखर आजाद, राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनयरतन सिंग यांच्या आदेशाने महाराष्ट्रात सर्वत्र समीक्षा बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे दि. 26 ऑगस्ट 2024 रोजी लातूर येथील डॉ. भालचंद्र ब्लड बँक या ठिकाणी ठिक :10:00 वाजता समीक्षा बैठकीला सुरुवात होणार आहे या बैठकीस महाराष्ट्र प्रभारी अनिलजी धनेवाल, राष्ट्रीय महासचिव अशोक भाऊ कांबळे, महाराष्ट्राचे माजी प्रदेशाध्यक्ष सिताराम भाऊ गंगावणे तसेच महाराष्ट्रातील वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत
या बैठकीला मराठवाड्यातील सर्व मराठवाडा पदाधिकारी, जिल्हाप्रमुख, सर्व तालुकाप्रमुख, आणि शहर प्रमुख यांनी उपस्थित राहावे बैठकीस येताना आतापर्यंत आपल्या कामाचा अहवाल आपण सोबत घेऊन यावा, तसेच आपले कार्यकारणीही सोबत असावी पावसाचे दिवस असल्याकारणाने आपण लवकर निघून वेळेवर हजर राहावे, ही समीक्षा बैठक म्हणजे येणाऱ्या विधानसभेची चाचपणी आहे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याने आपली ताकद दाखवण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने या समीक्षा बैठकीस हजर राहावे असे आव्हान मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे यांनी केले आहे.
0 टिप्पण्या