बदलापूर येथील मुलीवर लैंगिक अत्याचार करणा-यास फाशीची शिक्षा द्या -एम आय एम तर्फे औसा तहसिलदार मार्फत राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना निवेदन ..
औसा प्रतिनिधी
बदलापूर येथील शाळेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला असुन ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे.
ही घटना अत्यंत निंदनीय असून अशा घटनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.याकडे सरकारचा दुर्लक्ष होत आहे.यामुळे नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच ही घटना ताजी असतानाच चाकूर जिल्हा लातूर येथेही अशा प्रकारची घटना घडली आहे.यावर वेळीच आळा घालणे गरजेचे असुन याकरीता कडक कायदे करण्यात यावेत जेणेकरून अशा प्रकारच्या घटना भविष्यात होणार नाहीत.तरी बदलापूर व चाकुर जिल्हा लातूर येथील घटनेत सहभागी असणाऱ्या आरोपीच्या विरोधात कडक कार्यवाही करुन आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी.
व तसेच रामगिरी महाराज यांनी दोन धर्मियांमध्ये जाणुनबुजून जातीय तेड निर्माण करुन धार्मिक कलह, द्वेष पसरविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रत्येक जिल्ह्यात गुन्हे नोंद झालेले आहे,तरी रामगिरी गुरु महाराज यांना त्वरित अटक करा अन्यथा एम आय एम पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करुन औसा तहसीलदार कार्यालय समोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी औसा तहसीलदार मार्फत महामाहीम राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.यावेळी
शेख नाजम,जमीर पठाण, सय्यद इम्रान, इस्माईल बागवान, शेख मुखीद, अजहर कुरेशी, शेख नय्युम,हारुणखॉ पठाण, शेख मौला सय्यद शाबोद्दीन आदि उपस्थित होते.
0 टिप्पण्या