स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या स्मृती दिनानिमित्त औसा येथे मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर..
औसा प्रतिनिधी
लोकनेते स्व. विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त औसा, येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन श्री शैल्य उटगे यांच्या संकल्पनेतून व स्नेह श्री वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज दिनांक 18 ऑगस्ट 2024 रविवार रोजी श्री मुक्तेश्वर विद्यालय औसा येथे बस स्टँड जवळ 10 ते 2 वाजेपर्यंत भव्य मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.या महाआरोग्य शिबिराची सुरुवात बालरोग तज्ञ डॉ.योगेश उटगे यांच्या
हस्ते स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व द्विप प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले.यावेळी या शिबिरात आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी या महाआरोग्य तपासणी शिबिरात कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अमर खानापुरे, जिल्हा उपाध्यक्ष शकील शेख, तालुकाध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी, शहराध्यक्ष अजहर हाशमी, शिवसेना महिला आघाडी चे जयाताई उटगे, शहराध्यक्ष सुरेश भुरे, अशोक कुंभार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीचे जिल्हाध्यक्ष शेख रशीद सर, शहराध्यक्ष शेख सनाऊल्ला दारूवाले,अँड शाहनवाज पटेल, अँड समीयोद्दीन पटेल, आदमखा पठाण, सय्यद हमीद,अनीस जहागीरदार,अंगद कांबळे, अँड मंजूषाताई हजारे,खादर सय्यद, जयराज कसबे, मुजम्मील शेख,इस्माईल शेख, पाशा शेख,शेख हमीद सर, पुरुषोत्तम नलगे, संजीव औसेकर,बालाजी साळुंखे,खुंदमीर मुल्ला, नियामत लोहारे, भागवत माळी,पवन कांबळे,खाजाभाई शेख, मधुकर नलगे आदि कॉग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
.या शिबिरात औसा शहरातील महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन महाआरोग्य तपासणी करुन शिबिराचा लाभ घेतला.या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.या शिबिरात नागरिकांना विविध तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून तपासणी व मोफत उपचार करुन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेता यावी या उदात्त हेतूने या आयोजित शिबिरामध्ये बालरोग तज्ञ डॉ.योगेश कुटगे, डॉ सुदर्शन गुंठे, प्रदीप नागोरे, मधुमेह तज्ञ डॉ नीरज जमादार,किडनी विकार तज्ञ सुनीता पाटील, डॉ अर्पिता गुंठे,नाक कान घसा तज्ञ, डॉ रुपाली बावगे वेदना उपचार तज्ञ ,डॉ शितल मनाळे दंतरोग तज्ञ, इम्रान जमादार नेत्र तज्ञ यांनी उपस्थित राहून या शिबिराला सहकार्य केले.
0 टिप्पण्या