औसा येथे मिलन मुस्लिम मॅरेज ब्यूरो चा उद्घाटन संपन्न..
औसा प्रतिनिधी
औसा नगरपरिषद सभागृह कॉम्प्लेक्स येथे मिलन मुस्लिम मैरेज ब्यूरो चा उद्घाटन 15 ऑगस्ट 2024 गुरुवार रोजी कारी रफीक सिराजी यांच्या हस्ते करण्यात आला .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष कारी रफीक सिराजी हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना कलीमुल्लाह शाह कादरी, मौलाना इरफान सौदागर ,मौलाना हारून ईशाअती, मौलाना फहीम साहब,कारी नियाज अख्तर आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुस्लिम मैरिज ब्यूरो चे हाफिज शाहीद यानी केले.आणि या कार्यक्रमात मिलन मुस्लिम मॅरेज ब्युरो चा उद्घाटन करण्याचा काय उद्देश आहे यावर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रम प्रसंगी कारी रफीक सिराजी यानी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की मुला मुलींचे लग्न वेळेवर व्हावे व मुस्लिम समाजाच्या मुला मुलींना स्थळ शोधण्यासाठी आता चिंता कमी होणार आहे.आणि मुस्लिम समाजाच्या लोकानी स्थळ शोधन्यासाठी औसा येथे मिलन मुस्लिम मैरेज ब्यूरो शी संपर्क साधावे आणि मैरेज beuro चीफ हाफ़िज़ शाहिद व त्यांचे सहकारी मौलाना फेरोज ला सर्वानी सहकार्य करावे असे आव्हानही या उद्घाटनप्रसंगी कारी रफीक सिराजी यांनी केले.हा
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी हाफ़िज़ आरीफ मौलाना, फेरोज ईशाअती यांनी परिश्रम घेतले .यावेळी
या कार्यक्रमात सय्यद मुजफ्फर अली इनामदार,फहाद अरब,वहीद कुरेशी, हमीद सय्यद, एडवोकेट समीयोद्दीन पटेल,आदम खान पठाण, ज़मीर सर, एडवोकेट महेबूब शेख, शेख बाबा, सत्तार खळकाळे, लायक शेख, ज़मीर शेख आदि उपस्थित होते.
0 टिप्पण्या