शिवसेना महिला आघाडी तर्फे तहसीलदारांना विविध मागण्याचे निवेदन .
औसा प्रतिनिधी
औसा तहसील कार्यालयातून विद्यार्थी व पालक यांच्यासाठी शैक्षणिक कामासाठी लागणारे उत्पन्न रहिवासी राष्ट्रीयत्व शेतकरी प्रमाणपत्र भूमी प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलियर इत्यादी प्रमाणपत्राची आवश्यकता असते मागील एक महिन्यापासून इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यासाठी साईट चालत नसल्यामुळे विद्यार्थी पालकांची गैरसोय होत आहे असे प्रमाणपत्रे ऑफलाइन पद्धतीने तात्काळ द्यावेत तसेच श्रावण बाळ योजना व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभधारकाचे मंजुरी पत्र ऑफलाइन पद्धतीने देण्यात यावे 3 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या कराव्यात प्रभारी नियुक्तीच्या ठिकाणी कायमस्वरूपी अधिकारी कर्मचारी तात्काळ नियुक्त करावेत आणि नगर परिषदेमध्ये बांधकाम व इतर कामगारांसाठी होत असलेली आर्थिक पिळवणूक थांबवावी. अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका जयश्री ताई उटगे यांनी तहसीलदार औसा यांना निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर अशोक कुंभार, गोविंद खंडागळे, संजय उजळंबे, सुरेश भुरे, किरण कदम इत्यादींच्या सह्या आहेत.
0 टिप्पण्या