समाजाच्या लोकावर हल्ला करणाऱ्यावर कठोर कार्यवाही करा - समस्त मुस्लिम समाजाच्यावतीने औसा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन

 विशालगड व गजापुर गावामध्ये मस्जिद व मुस्लिम समाजाच्या लोकावर हल्ला करणाऱ्यावर कठोर कार्यवाही करा -

समस्त मुस्लिम समाजाच्यावतीने औसा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री व  गृहमंत्री यांना निवेदन 



औसा प्रतिनिधी मुख्तार मणियार 

विशालगड च्या पायथ्याशी असलेल्या छोट्या छोट्या वस्ती व गजापूर गावात गरीब मुस्लिम कुटुंबावर व धार्मिक स्थळावर जातीयवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जो भ्याड हल्ला केला आहे त्याचा औसा येथील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने 19 जूलै शुक्रवार रोजी औसा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.त्याचे सविस्तर वृत्त असे 

विशालगड गजापुर प्रकरणात कर्तव्यात कसूर करणाऱ्या जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांना त्वरीत निलंबीत करा.


शासनाकडून गजापुर येथील पिडीतांना 25 हजाराची तुटपुंजी मदत करण्यात आली आहे ती वाढवून प्रत्येकी 5 लाख रुपयाची मदत देण्यात यावी.



कोल्हापुर जिल्ह्यातील विशालगड पायथ्याशी चार कि.मी लांब असलेले गजापुर वस्ती येथे दिनांक 14/07/2024 रोजी काही संघटनेनी विशालगड किल्ल्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी सर्वांना एकत्र येण्याचे अहवान केले होते.


हे की, सदरील अतिक्रमण चा विशालगड किल्ल्यावरचे असताना विशालगड च्या पायथ्याशी असणारे चार कि.मी. लांब असणारे गजापुर वस्तीतील लोकांचे काही देणे घेणे नसताना या मनुवादी संघटनेचे गुंड प्रवृत्तीचे लोकांनी गजापुर गावातील धर्मस्थळाची तोडफोड करून धर्म ग्रंथाला फाडले. अल्पसंख्याक समाजाच्या घरावर दगडे फेक करून घरे जाळण्याचा प्रयत्न केला. मुस्लीम वस्ती व मस्जीदवर हल्ला करून बेफाम तोडफोड व जाळपोळ करण्यात आली. व तसेच या समाज कंटकांनी पवित्र कुरआन शरीफाचा अवमान केले. महिला वृध्दांना व लहान मुलांना मारहाण केली. तरी अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तात्काळ अट करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. तसेच या मागचे जे कोणी कर्ता धरता असेल त्याची चौकशी करून त्यांच्यावर कडक कार्यावाही करण्यात यावी.

 विशालगडावरील अतिक्रमण मुक्त करण्यासाठी 14 जुलै 2024 च्या दोन तीन दिवस आगोदर छत्रपती संभाजी राजे यांनी हिंदुत्वादी संघनांना एकत्रीत येवून सदरील अतिक्रमण हटविण्याचे अहवान केले होते असे आहवान करण्यात आल्यानंतर ही कोल्हापुरचे जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांनी याची गंभीर दखल घेऊन योग्य ते कायदा सुव्यवस्था अबादित राखण्यासाठी चोक बंदोबस्त व उपाययोजना करणे गरजेचे होते ते तसे ना करता सदरील प्रकरण हलक्यात घेतल्यामुळे या संघटनेमधील काही मनोवादी गुंड प्रवृत्तीचे लोकांनी दोन समाजात जातीय तेड निर्माण करण्याच्या उद्देशाने गाजापुर येथे मुस्लीम वस्तीवर भाड हल्ला करून हिंसाचार केला त्याला जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांनाही जबाबदार धरुन कर्तव्यात कसुर केल्यामुळे त्वरीत त्यांना निलंबीत करण्यात यावे.

विशालगड गजापुर हिंचारप्रकरणात काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांनी भेट देऊन झालेल्या नुकसानाची पहाणी केली व एकुण 56 कुंटुंबाना प्रत्येकी 25 हजार रुपये अर्थिक मदत देण्यात आली जे की, हि मदत तुटपुंजी असून गजापुर येथील नागरीकांचे यापेक्षाही अधिक नुकसान झालेले असून त्यांना प्रत्येकी 5 लाख रुपयाची मदत देण्यात यावी तसेच घरकुल योजनेतून सदरील नागरीकांना पक्के घर बांधून देण्यात यावे हि विनंती.


वरील तिन्हीही मागणी कायदेशीर रास्त असून यावर आपण त्वरीत निर्णय घेऊन मागण्या मान्य कराव्यात .अशी मागणी औसा येथील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने औसा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्री व यांना निवेदन देण्यात आले.यावेळी औसा येथील समस्त मुस्लिम समाजाचे बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या