अजित पवार यांच्या वाढदिसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे विविध स्पर्धांचे आयोजन. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा - जिल्हाध्यक्ष सुलेमान अफसर शेख

 अजित पवार यांच्या वाढदिसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे विविध स्पर्धांचे आयोजन.


जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा - जिल्हाध्यक्ष सुलेमान अफसर शेख



औसा प्रतिनिधी 


महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना श्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय विविध कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे लातूर जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन मंत्री संजय बनसोडे आ बाबासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ अफसर शेख, शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे,कार्याध्यक्ष पंडितराव धुमाळ, प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुलेमान अफसर शेख यांनी आयोजन केले आहे यामध्ये निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,रिल्स स्पर्धा चे आयोजन करण्यात आलेले आहे प्रथम पारितोषिक 11,111 द्वितीय पारितोषिक 7,111 तृतीय पारितोषिक 5,111 ठेवण्यात आलेले आहे. 29 जुलै रोजी निबंध स्पर्धेचे आयोजन औसा-आझाद इंडोर स्टेडियम, तुळजापूर रोड, औसा, उदगीर-रेड्डी एज्युकेशन सोसायटी 1 मु मजला कॅप्टन चौक,स्वामी विवेकानंद विद्यालय शिरूर ताजबंद ता. अहमदपूर येथे 11.00 वाजता करण्यात आले आहे.वक्तृत्व स्पर्धा दि .31/7/2024 रोजी आझाद महाविद्यालय,जयनगर माळवटी रोड लातूर येथे 11.00 वाजता राहील व रील्स 9637978500 या नंबर वर पाठवावे तरी या स्पर्धा मध्ये 10वी व 12 वी तील विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम व प्रदेश मुख्य सरचिटणीस विशाल विहिरे,जिल्हाध्यक्ष सुलेमान शेख, राम व्यवहारे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या