मोमीन गल्ली येथील मशीदी समोरील मोठ्या नालीचे दोन्ही स्लॅब फोडून पाण्यास वाट मोकळी करून द्यावी- उमर पंजेशा

मोमीन गल्ली येथील मशीदी समोरील  मोठ्या नालीचे दोन्ही स्लॅब फोडून पाण्यास वाट मोकळी करून द्यावी- उमर पंजेशा 


औसा प्रतिनिधी 

 औसा शहरातील मोमीन गल्ली येथील मशिदी समोरच्या मोठ्या नालीवर एका खाली एक अशे दोन स्लॅब आहेत, खालच्या स्लॅब ला सतत कचरा अडकून पाणी थांबत आहे , पाणी थांबल्यामुळे त्या परिसरात डासांचे प्रमाण वाढले आहे , पाणी थांबल्यामुळे दुर्गंधी येत आहे,सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असल्याने रोगराई पसरण्याची शक्यता आहे 

लवकरात लवकर स्लॅब फोडून पाणी जाण्यासाठी वाट करून  नाली वर स्लॅब टाकावे व पावसाळा सुरू असल्याने जागो जागी पाणी साचून शहरात डासांचे प्रमाण वाढले आहे त्यासाठी  शहरात फवारणी करावी , डासांचे पावडर टाकावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष उमर पंजेशा यांनी मुख्याधिकारी औसा यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. यावेळी निवेदन देताना मोमीन गल्ली चे नागरिक शब्बीर पठाण आदिची उपस्थिती होती. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या