विशालगड जि. कोल्हापूर येथील मस्जिदवर तसेच किल्ल्यावरील मुस्लीम वसाहतीत, हल्ला करणाऱ्या दंगेखोरावर कडक कायदेशीर कार्यवाही करुन पिडीतांना आर्थिक मदत द्या- एम आय एमच्या वतीने औसा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन

 विशालगड जि. कोल्हापूर येथील मस्जिदवर तसेच किल्ल्यावरील मुस्लीम वसाहतीत,  हल्ला करणाऱ्या दंगेखोरावर कडक कायदेशीर कार्यवाही करुन पिडीतांना आर्थिक मदत द्या- एम आय एमच्या वतीने औसा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन 


औसा प्रतिनिधी 

  किल्लेविशालगड, ता. शाहुवाडी जि. कोल्हापूर येथील किल्ला परिसरातील तसेच मलीक रेहान दर्गाह तसेच रजा मस्जीदवर हल्ला करुन मस्जीदची तोडफोड करण्यात आली तसेच आमच्या पवित्र ग्रंथाचे नासधूस करुन त्याची विटंबना करण्यात आली तसेच मुस्लीम लोकांची घरे, वाहने तसेच दुकाने जाळण्यात आली व त्यांची नासधूस करण्यात आली ही अतिशय गंभिर बाब आहे. आम्ही या घटनेचा तिव्र निषेध करत आहेत 


तरी आम्ही सदर निवेदानाद्वारे मागणी करतोत की, या घटनेतील पिडीतांना नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी 20 लाख रु. देण्यात यावेत. तसेच या घटनेची एस.आय.टी. मार्फत चौकशी करण्यात येऊन या घटनेतील समाज कंटक दोषींवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करुन त्यांना कडक शासन करण्यात यावे जेणे करुन अशा प्रकारचे गुन्हे भविष्यात घडणार नाही.या मागणीसाठी एम आय एम औसा च्या वतीने औसा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले.यावेळी एम आय एम चे सिनियर नेते अँड गफुरूल्ला हाशमी, शहराध्यक्ष सय्यद कलीम, सय्यद जमीरोद्दीन, इम्रान बागवान, शकील देशमुख,मुक्तदीर पटवेकर, सय्यद अली, शेख अलीम, नासेर पठाण, अल्ताफ तांबोळी,गुणवंत ढाले,अस्लम नवाब, सय्यद आरेफ, शेख मतीन,अनवर पठाण, सय्यद नासेर,अनवर खोजन, शेख ताजोद्दीन, शेख इब्राहिम,अमन बागवान,जैद बागवान अहेमद खोजन यांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या