मुसलमानांचा ऐवढा तिरस्कार का ..ॽ माजी आमदार दिनकर माने

 मुसलमानांचा ऐवढा तिरस्कार का ..ॽ  माजी आमदार दिनकर माने



औसा प्रतिनिधी - औसा येथे महाविकास आघाडीच्या वतीने औसा येथील लातूर मोड, टी- पॉइंट येथे सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी आपले मत व्यक्त केले, असता या रास्ता रोको आंदोलनात आपले मत व्यक्त करताना शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने यांनी आंदोलनास  संबोधित करताना म्हणाले की, विधानसभेच्या चालू अधिवेशनात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केला असता, मुस्लिम समाजाविषयी आरक्षणाचा मुद्दा लावून धरला असता, याला उत्तर न देता औशाचे  आमदार अभिमन्यू पवार यांनी या विषयावर आपले मौन बाळगुन जागेवर बसूनच उत्तर  दिले नाही , याविषयी मुस्लिम समाजाच्या विषयी कसल्याही प्रकारची सहानुभूती न दाखवता, आपले मौन बाळगल्याने मुस्लिम समाजात असंतोष पसवला आहे, मुस्लिमांविषयी, मुस्लिम समाजाचा ऐवढा तिरस्कार का ? असा प्रश्न यावेळी उपस्थित केला. यानंतर या आंदोलनाच्या ठिकाणी तसेच अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे निवेदन स्वीकारले.यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या