विशालगड येथील मस्जिदवर हल्ला करणाऱ्या व मुसलमानाची घरे जाळणाऱ्या वर कडक कारवाई करून प्रत्येकी पीडितांना 25 लाख रुपये ची आर्थिक मदत द्या- वंचित बहुजन आघाडीची मागणी

 विशालगड येथील मस्जिदवर हल्ला करणाऱ्या व मुसलमानाची घरे जाळणाऱ्या वर कडक कारवाई करून प्रत्येकी

पीडितांना  25 लाख रुपये ची  आर्थिक मदत द्या- वंचित बहुजन आघाडीची मागणी



औसा प्रतिनिधी 



मुस्लिम समाजामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या उपस्थित समाजकंटक आतंकवादीकडून कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड येथे मशिदीवर आतंकवादी हल्ला करून मस्जिदची तोडफोड  करण्यात आली मज्जिद मधील साहित्य सह धार्मिक कुराण जाळण्यात आले तसेच मुस्लिम लोकांची घरे जाळण्यात आले अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली. महिलांना मारहाण करण्यात आली.या घटनेचा निषेध करीत वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून औसा तहसीलदार मार्फत राष्ट्रपती  यांना निवेदन देण्यात आले. या समाजकंटक आतंकवादीविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी तसेच ज्या मुसलमानाची घरे जाळण्यात आली त्यांना प्रत्येकी 25 लाख रुपये मदत देण्यात यावी. पोलिसांनी त्यावेळी बघायची भूमिका घेतली म्हणून पोलिसांचे विरुद्ध निलंबनाची कारवाई  सह बडतर्फ ची कारवाई करण्यात यावी तसेच कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांची तात्काळ हकालपट्टी करून त्यांचे विरुद्ध पण कारवाई करण्यात यावी . तसेच सदर घटनेमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई समाज कंटकाकडून वसुल करण्यात यावी.जेणे करून अशा प्रकारे कृत्य पुन्हा होणार नाही.अन्यथा मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर वंचित बहुजन आघाडी तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.या मागणीसाठी औसा येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने औसा तहसीलदार मार्फत महामाहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे औसा तालुका प्रभारी अध्यक्ष महावीर बनसोडे शहराध्यक्ष सद्दाम पठाण, उपाध्यक्ष मैजोद्दीन शेख, महासचिव इलियास चौधरी, महासचिव सोहेल शेख, आसिफ,आखिब मजहर सिद्दीकी,निहाल,गौतम कांबळे, सुनीता सगट, आफताब शेख, अर्शद शेख,आतिक शेख,अफसर शेख,बाबा शेख,जफर शेख,मुज्जमील शेख बाळू ढोबळे, बालाजी ढोबळे,आरेफ सय्यद आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या