मुलींच्या मोफत शिक्षणाची अंमलबजावणी करावी- राष्ट्रवादीचे आंदोलन.
लातूर प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे यांच्या सूचनेनुसार मुलींना मोफत शिक्षण देणार म्हणून राज्य सरकारने घोषणा केली होती. परंतु त्याची अंमलबजावणी केली नाही. याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने लातूर येथे छत्रपती. शिवाजी महाराज चौक, लातूर येथे आंदोलन करण्यात आले.
शिक्षणमंत्री चंद्रकांत
पाटील यांनी १ जून पासून मुलींना मोफत शिक्षण दिले जाईल, अशी घोषणा केली होती. त्याचे काय झाले व नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी कारवाई करावी या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने लातुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले.यावेळी
या आंदोलनात पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे, कार्याध्यक्ष रशीद शेख, प्रदेश सचिव मदन काळे, प्रा. गंगापुरे, महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई कदम, शहराध्यक्ष मनिषा कोकणे, स्नेहा मोटे, कल्पना फरकांडे, इरफान शेख, शेख सनाऊल्ला दारुवाले,बक्तावर बागवान आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या