जनावरांसाठी चारा व पाणी तसेच खरीप हंगामात बियाणे शासनाकडून उपलब्ध करून द्यावे.
औसा प्रतिनिधी
औसा
जनावरांसाठी चारा व पाणी तसेच खरीप हंगामात बियाणे शासनाकडून उपलब्ध करावे या विविध मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरद पवार गट ) वतीने औसा तहसीलदार यांना निवेदन आज रोजी देण्यात आले आहे. त्याचे सविस्तर वृत्त असे
संपुर्ण महाराष्ट्रात खरीप हंगामाच्या मशागती करण्यासाठी बळीराजा सरसावला आहे. खरीप 2024 हंगामामध्ये लातूर जिल्ह्यात किती बियाण्यांची आवश्यकता आहे, तेवढे बियाणे उपलब्ध आहे काय, शासन घरचे बियाणे पेरण्यासाठी आग्रह धरत आहे याचा अर्थ बियाण्याचा तुटवडा आहे काय? कृषि मंत्री आकडेवारी लपवत आहेत काय? अवघ्या काही दिवसावर मान्सून येऊ पाहत आहे. त्यासाठी शेतकरी कुटुंब आपल्या काळ्या आईच्या मशागतीत गुंतला आहे. सरकारच्या योजनेप्रमाणे 10 जुन पुर्वी खालील मागण्याच्या पुर्ततेसंबंधी तात्काळ कार्यवाही करावी.
शासनाने खरीपासाठी बियाणे तात्काळ उपलब्ध करून द्यावे.
सन 2023 चा पिकविमा तात्काळ वाटप करावा.
पाणी चारा जनावरांसाठी तात्काळ उपलब्ध करून द्यावे.
वन्य प्राण्यापासून होत असलेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे.
मराठवाडयात सोयाबीनचा पेरा लातूर मध्ये सर्वात जास्त असताना सोयाबीन संशोधन केंद्र परळीला कसे काय हलवले.
ग्रामीण भागांमध्ये पिण्याचे पाण्याचे टैंकर उपलब्ध करून द्यावेत.
तरी माननीय तहसीलदार साहेबांनी वरील सर्व मुद्यावर तात्काळ उपाययोजना कराव्यात. अन्यथा वरील विषयाच्या संदर्भात आम्हाला न्यायासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी .अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटचे तालुकाध्यक्ष शामराव साळुंखे -पाटील,भरत सुर्यवंशी, रशीद शेख, गोंवींद जाधव सनाऊल्ला शेख, अजित मुसांडे,यशवंत भोसले,समीरखान पठाण, अशोक गरड, बाबुराव राठोड,आदि उपस्थित होते.
0 टिप्पण्या