इंग्रजी मधील उज्वल यशाबद्दल योगिता सावंत यांचा सत्कार...
औसा/ प्रतिनिधी : - श्री मुक्तेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयची विद्यार्थिनी कुमारी योगिता नेताजी सावंत या विद्यार्थिनीने पाटील एक्सक्लुझिव्ह इंग्लिश अकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच झालेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये इंग्रजी विषयात १०० पैकी ९७ % टक्के गुण घेऊन उज्वल यश संपादन केल्याबद्दल पाटील एक्सक्लुझिव्ह इंग्लिश अकॅडमी मध्ये सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. योगिताच्या यशाबद्दल मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवलिंगप्पा औटी सचिव डॉ. बस्वराज पटणे, मुख्याध्यापक शरणाप्पा जलसकरे, अकॅडमीच्या मार्गदर्शक श्रीमती पाटील, योगिताचे आई, वडील व नातेवाईक यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत..
0 टिप्पण्या