वडीगोद्री येथील ओबीसी नेत्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी औसा येथे उद्या रस्ता रोको
औसा प्रतिनिधी
भारतीय संविधानानुसार ओबीसी आरक्षणाला कसल्याही प्रकारचा धक्का लागू नये व ओबीसी प्रवर्गावर अन्याय होऊ नये या मागणीसाठी वडीगोद्री येथे ओबीसी चे नेते प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आमरण उपोषण सुरू केले असून या उपोषणाचा बुधवारी सहावा दिवस आहे भिशी समाजाचे आरक्षण बचाव करण्यासाठी आयोजित केलेल्या उपोषणास सकल ओबीसी समाज औसा तालुका यांनी पाठिंबा असल्याचे निवेदन तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्याकडे सादर केले आहे. तसेच वडीगोद्री येथील ओबीसी बचाव उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी एप्रोच रोड चौक औसा येथे सकाळी 11 वाजता सकल ओबीसी समाज औसा तालुक्याच्या वतीने एक दिवसीय रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा सकल ओबीसी समाज औसा यांच्या वतीने तहसीलदार भरत सूर्यवंशी आणि पोलीस निरीक्षक औसा यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर सर्वश्री चांगदेव माळी, बाळू कांबळे, महेश फुटाणे, पियुष मेत्रे, शरद पेटकर, मनोज फुटाणे, गणेश शिंदे, खंडेराव क्षीरसागर, अनिल जाधव, विशाल माळी, आकाश कांबळे, धनंजय कटारे, विजय फुटाणे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 टिप्पण्या