पाडव्या निमीत्त राज्य शासनाकडून घोषीत करण्यात आलेल्या, आनंदाचा शिधा, त्वरीत वाटप करा -खुंदमीर मुल्ला
औसा प्रतिनिधी
राज्य शासनाकडून पाडव्यानिमीत्त राज्यसह औसा तालुका शहर राशन धारक लाभार्थ्यांना व शेतकरी राशनधारक योजनेच्या लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्याचे घोषणा करण्यात आलेली होती. पण या घोषणेनंतर अचानक लोकसभा निवडणुकीची अचार संहिता लागल्यामुळे औसा शहर व तालुक्यातील राशन धारक लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आलेला नाही. आता लोकसभेची निवडणुक होऊन अचार संहिताही उठविण्यात आलेली आहे. तरी राज्यशासनाकडून देण्यात येणाऱ्या आनंदाचा शिधा या महिन्यात धान्य वाटपसोबत आनंदाचा शिधाही वाटप करण्यात यावा अशी मागणी औसा विकास मंचचे अध्यक्ष सय्यद खुंदमीर मुल्ला यांनी औसा तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.
0 टिप्पण्या