औसा शहरात व नविन हद्दवाढ भागात मुरुम टाका-
उमर पंजेशा यांची मागणी
औसा प्रतिनिधी
सद्या पावसाळा सुरु झाला असून औसा शहर तसेच नविन हद्दवाढ भागात रस्त्यावर जागोजागी पाणी साचल्यामुळे नागरीकांना चालणे फिरणे कठीण झाले आहे. तसेच विद्यार्थ्यांची शाळा सुरु झाली असून विद्यार्थ्यांनाही रस्त्याआभावी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच वृध्द नागरीकांनाही अडचणी चे होत आहे. तसेच नविन हद्दवाढ भागात तर सततच्या पावसामुळे गाडी घेऊन जाता येत नाही म्हणून नागरीका चारशे ते पाचशे फुट दुर गाडी लावून घराकडे जात आहे. एकुणच नागरीकांचे हाल होत आहे.
तरी शहरात व नविन हद्दीवाढ भागामध्ये आवश्यक ठिकाणी मुरुम टाकून रस्त्यावर नागरीकांना रहदारी करण्यात यावी. या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते उमर पंजेशा यांनी औसा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
0 टिप्पण्या