शहरात स्पर्श इंग्लिश स्कूलचे संलग्नित
वातानुकूलित असलेली स्वतंत्र इमारत किंडरगार्टेन सेवेत सुरू
औसा/प्रतिनिधी :
शहरात स्पर्श इंग्लिश स्कूलचे संलग्नित वातानुकूलित असलेली स्वतंत्र इमारत किंडरगार्टेन लहान मुलांच्या शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सेवेत सुरू करण्यात आली असून या नुतन इमारतीत लहान मुला मुलींसाठी प्ले ग्राऊंड ग्रुप, नर्सरी, एलकेजी, व युकेजीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्श किंडरगार्टेन ची स्वतंत्र सर्व भौतिक सोयी- सुविधायुक्त इमारतीचे उद्घाटन दि. ७ जून शुक्रवार रोजी सायंकाळी ४ : ०० वाजण्याच्या सुमारास संस्थेच्या अध्यक्षा सौ. हनिफा पठाण मॅडम तसेच संस्थेचे सचिव शब्बीर शेख यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
विद्याथ्यांच्या आदर्शवत शिक्षणाची गुरुकिल्ली अर्थात स्पर्श किंडरगार्टेन स्पर्श
इंग्लिश स्कूलच्या संलग्नित नव्याने बांधण्यात आलेल्या सर्व सोयीं सुविधांनी युक्त भव्य इमारतीत अद्यावत डिजिटल रूपी औसेकरांच्या सेवेत सुरू करण्यात आली आहे.
प्रथम प्रवेश घेणाऱ्याला प्राधान्य दिले जाणार. विशेषतः ३ ते ६ वयोगटातील लहान मुलांसाठी डिझाइन केलेले बालवाडी,
प्ले ग्रुप नर्सरी, एलकेजी, युकेजीच्या लहान मुला मुलीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे असे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. भारतातील नामांकित शाळेत वापरले जाणारे स्प्रिंग बोर्ड या प्रकर्षणाचे दर्जेदार व आकर्षक पुस्तके लहान मुलांसाठी बनवलेली पुस्तके व प्रत्येक महिन्यासाठी स्वतंत्र
अभ्यासक्रम प्रत्येक वर्गासाठी
मर्यादित प्रवेश संख्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा स्वतंत्र प्रोग्रेस अहवाल फाईल ची व्यवस्था करण्यात आली आहे. डिजिटल अध्यापन पद्धतीचा पुरेपूर वापर व ऍक्टिव्हिटी फाईल शिक्षक प्रवेश उपलब्धणाऱ्या शैक्षणिक किटमध्ये स्कूल बॅग, बुक्स,
नोटबुक, असाइनमेंट बुक, दोन
रेगुलर युनिफॉर्म दिला जाणार आहे. शाळेचे असलेले स्वतंत्र स्कूल होमवर्क प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र्य गुगल अध्यापन पद्धतीचा पुरेपूर वापर प्रत्येक वर्गासाठी केला जाणार आहे व मर्यादित प्रवेश संख्या राहणार आहे. शाळेत शनिवारचा उपक्रम म्हणून डान्स, योगा, झुंबा, एरोबिक्स, ड्रॉइंग आर्ट अँड क्राफ्ट व इतर खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी सहा वर्ष असल्याने प्रथम प्रवेश घेणाऱ्याला प्राधान्य देण्यात येणार आहे, तर आजच आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करावा असे मुख्याध्यापक सुलतान शेख, सुमित सर यांनी केले असून आदर्श नगर, सारोळा रोड, औसा येथे संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या