औसा विधानसभा मतदारसंघात मतदानाची तयारी पूर्ण
.....
307 मतदान केंद्रावर दोन लाख 94 हजार 86 मतदार करणार मतदान
.....
औसा:-
40 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघा अंतर्गत 239 औसा विधानसभा क्षेत्रांतर्गत मतदानाची तयारी पूर्ण झालेली असून आज सर्व मतदान अधिकारी कर्मचारी मतदान केंद्रावर सर्व साहित्यासह पोहोचले असल्याची माहिती सहाय्यक मतदान अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी दिली आहे.
औसा विधानसभा मतदान क्षेत्रांतर्गत 307 मतदान केंद्र असून यासाठी 1 हजार 368 अधिकारी कर्मचारी यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. सदरील मतदान सुरळीत व्हावे यासाठी सातशे पन्नास पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. औसा विधानसभा मतदान क्षेत्रात पंचायत समिती येथे सखी बूथ, श्री मुक्तेश्वर विद्यालय येथे आदर्श मतदान केंद्र, अजीम हायस्कूल येथे दिव्यांगाचे बूथ तर दापेगाव येथे युवा मतदार केंद्र निर्माण केले आहेत. सर्वच मतदान केंद्रावर सावली आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उद्या सकाळी सहा वाजल्यापासून दर दोन तासाला मतदानाची टक्केवारी किती झाली यासाठी विशेष कक्ष तहसील कार्यालयात स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात 16 कर्मचाऱ्याच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून तात्काळ मतदानाची टक्केवारी संकलित करण्याचे काम होणार आहे. यासाठी नोडल अधिकारी बालाजी तेलंग आणि दीपक क्षीरसागर काम पाहत आहेत. सदरील मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी नायब तहसीलदार इंद्रजीत गरड, नायब तहसीलदार सुरेश पाटील, नायब तहसीलदार दत्ता कांबळे, गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे आदी काम पाहत आहेत.
0 टिप्पण्या