राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त औसा येथे उस्फुर्त रक्तदान.

 राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त औसा येथे उस्फुर्त रक्तदान.



 औसा प्रतिनिधी

 लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त होळकर प्रतिष्ठान औसा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती समिती औसा यांच्या वतीने अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त येथील सांस्कृतिक सभागृहामध्ये बुधवार दिनांक 29 मे 2024 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 31 मे रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भव्य दिव्य स्वरूपात विविध उपक्रमाने जयंती महोत्सव संपन्न होणार आहे बुधवार दिनांक 29 मे रोजी होळकर प्रतिष्ठान औसा आणि जयंती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उस्फूर्तपणे रक्तदान करून गरजू रुग्णांना वेळेत रक्त देता यावे या राष्ट्रीय भावनेतून उजास्त हेतूने तरी त्या तरुणांनी रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतला शिबिराच्या यशस्वीतेसाठी जयंती समितीच्या पदाधिकाऱ्यां सह जयंती समितीचे अध्यक्ष नागेश कांबळे, धनगर समाजाचे अध्यक्ष हनुमंत कांबळे, राजेश सलगर, महादेव कांबळे, अमोल कांबळे इत्यादींनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या