चक्रीवादळाने पोल्ट्री फार्म शेड उध्वस्त झाल्याने लाखोचे नुकसान.
औसा प्रतिनिधी
रविवार दिनांक 26 मे 2024 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास औसा तालुक्यातील खानापूर शिवारामध्ये चक्रीवादळाच्या तडाख्याने पोल्ट्री फार्म चे शेड उध्वस्त होऊन शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की खानापूर शिवारातील निवृत्ती गोविंदराव कटके आणि महादेव निवृत्ती कटके यांच्या शेतामधील खेडमध्ये कुक्कुटपालनचा व्यवसाय नव्याने त्यांनी उभा केला होता. रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या चक्रीवादळामुळे शेतातील पोल्ट्री फार्म च्या शेड वरील पत्रे उडून गेले तसेच अवकाळी पाऊस आल्यामुळे विटाच्या भिंती पडल्याने व शेडचे लोखंडी अँगल आणि पाईप पडल्यामुळे शंभर ते दीडशे कोंबड्या मृत्युमुखी पडल्या तसेच वादळी वाऱ्यात झालेल्या पावसामुळे कोंबड्यासाठी आणलेले पशुखाद्य तसेच मशीन सीसीटीव्ही कॅमेरा यासह कृषी अवजारे पाईप असे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हवामान खात्याने रेमंड चक्रीवादळाचा अंदाज वर्तविला असून या वादळाचा परिणाम म्हणून तालुक्यातील खानापूर शिवारातील निवृत्ती कटके यांच्या शेतातील पोल्ट्री फार्म उध्वस्त झाल्याने कुक्कुटपालन व्यवसायिक शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.
0 टिप्पण्या