सोयाबीन लागवड पंचसूत्री तंत्रज्ञानाची कार्यशाळा संपन्न.
औसा प्रतिनिधी
आज दिनांक 30 मे 2024 रोजी मौजे बऱ्हाणपूर तालुका औसा येथे खरीप हंगाम पूर्व शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले यावेळी मंडळ कृषी अधिकारी औसा श्री डी वाय स्वामी यांनी सोयाबीन लागवड तंत्रज्ञानामधील पंचसूत्री कार्यक्रम राबवण्याबाबत तसेच गोगलगाय नियंत्रणाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले कृषी सहाय्यक कंदले एपी यांनी बियाणे उगवण क्षमता तपासणी बीज प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती दिली. कृषी पर्यवेक्षक श्री एन जी शिंदे व श्री ठोंबरे ए जी यांनी महाडीबीटी वरील यांत्रिकीकरण योजना व बीबीएफ आणि टोकन पद्धतीने लागवड तंत्रज्ञान विषयी माहिती दिली. यावेळी गावचे सरपंच श्री अनिल मोरे उपसरपंच राहुल पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष श्री रामानंद स्वामी तसेच यावेळी औसा मंडळातील कृषी सहाय्यक श्री अंधारे सर वाडकर सर कदम व बऱ्हाणपूर येथील कृषी सहाय्यक श्रीमती राजमाने एस टी आणि गावातील प्रगतीशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या