पावसाळा सुरू होण्यापूर्वी मोठी नाली साफ सफाई करून घ्या व तसेच औशात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा-औशातील नागरिकांची मागणी
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील काझी गल्ली, मोमीन गल्ली,ढोर गल्ली व कुतुबशाही मोहल्ला येथून जाणारी मोठी नाली ही दरवर्षी तुडुंब भरून नाली ब्लाक होत आहे. मोठी नाली ब्लॉक झाल्यामुळे शहराचे पाणी हे संबंधित भागातील नागरिकांच्या घरात शिरत आहे.त्यामुळे दरवर्षी या संबंधित भागातील नागरिकांच्या घरात शिरुन जिवनावश्यक वस्तुंचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, ते नुकसान होऊ नये म्हणून यावर्षी मान्सून पूर्व म्हणजेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी सदरील मोठी नाली साफ सफाई करून घ्यावीत व पावसाळ्यात होणा-या नागरिकांचे नुकसान टाळावे. व तसेच
औसा शहरात सद्या मोकाट कुत्रे (श्वान) हे जास्त झालेले असल्यामुळे त्यांनी १०/०५/२०२४ रोजी औसा शहरातील ब-याच नागरीकांना चावा घेतला आहे. त्याबाबत लोकमत पेपरमध्ये बातमी प्रसिध्द झालेली आहे. सद्या शाळांना सुट्या असल्यामुळे लहान मुले घराच्या बाहेर जास्त प्रमाणात राहत असल्यामुळे त्यांना सदरील कुत्र्यांचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरीकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी मोकाट कुत्र्यांचा त्वरीत बंदोबस्त करावा या दोन्ही मागण्यासाठी मुख्याधिकारी यांनी वरील दोन्ही विषयाकडे त्वरित गांभीर्याने लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्यावा. अशी मागणी औसा शहरातील नागरिकांनी दिनांक 13 मे 2024 सोमवार रोजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी निवेदन सादर करताना उमर पंजेशा, जिलानी करपुडे, महेदी सय्यद, खिजर कुरेशी, जाफर कुमारकिरी यांची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या