एक दिवशीय हज प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
.
लातूर (विशेष वार्ताहर) - गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी म्हणजेच 2024 मध्ये हजला जाणाऱ्या हज यात्रेकरुसाठी दिनांक 14-5-2024, वार मंगळवार रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 06:30 पर्यंत मदरसा दारुल उलूम सिद्दिकिया लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली एम.के.फंक्शन हॉल ६० फूट रोड,लातूर येथे एक दिवशीय हज प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या प्रशिक्षण शिबिरात मालेगाव येथील मुफ्ती हसनैन साहेब रहमानी व तज्ज्ञ उलेमा-ए-किराम यांच्या उपस्थित राहणार आहेत.यात्रेकरूंच्या सोयीसाठी दुपारी 12 ते 1 या वेळेत भोजनाची व्यवस्था असेल.सौजन्य शान ज्वेलर्स,भुसार लाईन, लातूर.हज ही एक महान उपासना आहे-बहुतेक लोकांना त्यांच्या आयुष्यात एकदाच हज करण्याची संधी मिळते आणि तीही प्रत्येकाला मिळत नाही.सर्वशक्तिमान अल्लाहची कृपा आहे की तो आपल्यात कमकुवतपणा असूनही हज आणि उमराह करण्याची क्षमता देत आहे.आता हे आपले कर्तव्य आहे की मानसिक आणि आध्यात्मिक धड्यानुसार तेथील पाच दिवसीय मुख्य इबादत करण्याची पद्धत शिकणे.त्यामुळे 2024 मध्ये हजला जाणाऱ्या हज यात्रे करूंनी या प्रशिक्षण शिबिरात उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या