येत्या 8 दिवसात गुंठेवारी प्रस्ताव निकाली काढा अन्यथा पाय-यावर बेमुदत धरणे आंदोलन करणार .
औसा प्रतिनिधी
औसा नगर पालिकेमध्ये मागील दोन वर्षापासून प्रलंबीत असलेले गुंठेवारी नावनोंदणी प्रस्ताव येत्या आठ दिवसात 100 टक्के निकाली काढावे अन्यथा औसा नगर पालिकेच्या पायऱ्यांवर बेमुदत धरणे अंदोलन करण्यात येईल.असा इशारा औसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना कॉग्रेस पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आले.त्याचे सविस्तर वृत्त असे
मागील दोन ते अडीच वर्षापासून औसा नगर पालिकेत औसा शहरातील व परिसरातील नागरीकांच्या वतीने गुंठेवारी नावनोंदणीचे शेकडो प्रस्ताव नगर पालिकेत दाखल करण्यात आलेले आहेत.
हे की, औसा नगर पालिकेत नगर रचनाकार अभियंताकडून अनेक फाईल मागील दोन वर्षापासून प्रलंबीत ठेवण्यात आलेले आहे. ज्यामुळे औसा शहरातील नवीन वसाहतीमध्ये राहणाऱ्या नागरीकांना बांधकामासाठी लागणाऱ्या बांधकाम परवाना व नगर पालिकेच्या इतर मुलभूत सुविधा तसेच केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना व इत्यादी योजनेपासून वंचीत रहावे लागत आहेत. नगर रचनाकार अभियंता हे चुकून एखाद्या वेळेस नगर पालिकेमध्ये हजेरी लावतात तरी पण नागरीकांना भेटतही नाही. त्यांचे फोन ही घेत नाहीत. अनेक फाईल अर्धवट भुमीअभीलेखाकडून मोजणी होऊन सुध्दा सदरील फाईल जाणुनबुजून चिरीमिरीसाठी पेंडींग ठेवण्यात येत आहे किंवा भूमी अभीलेख हे चुकीची मोजणी केली आहे असे शेरा मारून जाणुनबुजून सदरील फाईल पेंडींग ठेवण्यात येत आहे. त्या फाईल एजेंट मार्फत येतात त्या फाईल त्वरीत चिरीमिरी घेऊन नियमबाह्य निकाली काढण्यात येत आहेत.ज्या बांधकाम परवाने व फाईल नियमबाह्य काढण्यात आलेल्या आहेत त्याची विभागीय चौकशी करण्यात यावी . तसेच नगरपालिकेमध्ये पेंडीग असलेले अंदाजीत 300 च्या वर गुंठेवारीचे प्रस्तावित फाईल येत्या 8 दिवसात 100 टक्के निकाली काढण्यात यावे अन्यथा औसा नगरपालिकेच्या पाय-यावर बसून जनसामान्य औसेकरांच्या न्याय हक्कासाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा कॉग्रेस पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे दिला आहे.यावेळी या निवेदनावर कॉग्रेसचे जेष्ठ नेते आदमखॉन पठाण,माजी उपनगराध्यक्ष खादरभाई सय्यद, शहर कार्याध्यक्ष पुरुषोत्तम नलगे,शहर उपाध्यक्ष अनीस जहागीरदार, खुंदमीर मुल्ला,मुजम्मील शेख,माजी नगरसेवक अँड समीयोद्दीन पटेल, ओबीसी सेल चे माजी शहराध्यक्ष भागवत माळी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 टिप्पण्या