निवडणूक काळात सर्व उत्सव कायद्याचे पालन करून शांततेत साजरे करावेत.
औसा प्रतिनिधी
देशात सार्वत्रिक लोकसभेची निवडणूक सुरू असून आपल्या मतदारसंघांमध्ये एक महिन्यानंतर लोकसभेसाठी मतदान होणार आहे निवडणूक काळामध्ये अनेक राष्ट्रपुरुषांच्या जयंती सर्वधर्मीय बांधवांचे सण उत्सव कायद्याचे पालन करून शांततापूर्ण वातावरणामध्ये साजरे करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन शांतता समितीच्या बैठकीत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. येणाऱ्या काळात गुढीपाडवा, पवित्र रमजान ईद, महात्मा फुले जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, श्रीराम नवमी, हनुमान जयंती आणि महावीर जयंती असे अनेक उत्सव साजरे केले जात असून हे उत्सव साजरे करताना प्रत्येक नागरिकांनी कायद्याचे पालन करावे आणि सामाजिक सलोखा कायम ठेवून उत्सव साजरी करावेत असे आवाहन औसा रेनापुर विभागाचे उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे यांनी केले. लोकसभेच्या निवडणुकीत निमित्ताने आदर्श आचारसंहिता लागू झाली असून कुठल्याही धार्मिक कार्यक्रमांमध्ये किंवा राष्ट्रपुरुषांच्या जयंती कार्यक्रमांमध्ये कुठल्याही व कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना सहभागी करून घेऊ नये. तसेच शहरामध्ये विनापरवाना जयंती किंवा उत्सवाचे होर्डिंग लावू नयेत. कोणत्याही होर्डिंग वर राजकीय नेत्यांचे फोटो छापू नयेत आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी प्रशासनाला सर्व जनतेने सहकार्य करावे अन्यथा प्रशासनास नाविलाजाने कायदेशीर कार्यवाही करावी लागेल असेही या बैठकीमध्ये सांगण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी, मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, सहाय्यक गटविकास अधिकारी कुलकर्णी, पोलीस निरीक्षक सुनील रिजतवाड, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र केदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भोळ यांच्यासह प्रशासनातील विविध अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये औसा तालुक्यातील सर्व धर्मीय शांतता समितीचे सदस्य व विविध गावातून पोलीस पाटील तंटामुक्तीचे अध्यक्ष यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या