हनुमान मंदिरापासून बौद्ध नगर कडे जाणाऱ्या भागात रोडचे काम दोन महिन्यापासून रखडले.
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील लातूर वेस हनुमान मंदिरापासून बौद्ध नगर कडे खादी कार्यालयापासून जाणारा रस्ता रुंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले असून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर परिषद प्रशासनाने या रस्त्यावरील अतिक्रमण मोहीम हटवून रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात केली परंतु मागील दोन महिन्यापासून हे काम बंद पडले असून मंदिरापासून दक्षिण बाजूला अर्धवट रस्ता केला आहे तर उत्तर बाजू तसेच ठेवण्यात आला असून या रस्त्याचे अर्धवट काम करून सध्या काम बंद पडल्यामुळे परिसरातील नागरिकांना अत्यंत त्रास सहन करावा लागत आहेत तसेच या रस्त्यावरून कोरंगळा, भादा, भेटा, आंदोरा, कळमाथा, समदर्गा आणि मुरुड आदि भागाकडे मोठ्या प्रमाणात रहदारी असल्यामुळे या ठिकाणी अर्धवट काम झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. सतत होणारी वाहतुकीची कोंडी ही वाहन चालकाची दररोजची डोकेदुखी बनली आहे. तसेच खादी कार्यालयाच्या पाठीमागे पेट्रोल पंप असल्यामुळे डिझेल पेट्रोल भरण्यासाठी जाणाऱ्या येणाऱ्या वाहनचालकांनाही वाहतुकीची कोंडी होत असून वाहन चालवताना अत्यंत त्रास होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या अनागोंदी कारभारामुळे अर्धवट काम करून रस्त्याचे राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी कधी मुहूर्त लागणार अशी चर्चा होत असून हनुमान मंदिर ते खादी कार्यालय मार्गे बौद्ध नगर कडे जाणाऱ्या या रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे आणि पावसाळ्यापूर्वी हा रस्ता सुरळीत करावा अशी मागणी होत आहे.
0 टिप्पण्या