धाराशिव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीसाठी सौ. अर्चनाताई पाटील यांना उमेदवारी दिल्याबद्दल औशात आनंदोत्सव साजरा.

 धाराशिव लोकसभा मतदारसंघात  राष्ट्रवादीसाठी सौ. अर्चनाताई पाटील यांना उमेदवारी दिल्याबद्दल औशात आनंदोत्सव साजरा.




औसा प्रतिनिधी 


धाराशिव (उस्मानाबाद) लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी अजीत दादा पवार गट यांना सोडण्यात आले असल्याने  सौ. अर्चना ताई पाटील यांना उमेदवारी दिल्याबद्दल 4 मार्च गुरुवार रोजी फटाके फोडुन औसा येथे आनंदोत्सव करण्यात आला . हा आनंदोत्सव साजरा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांच्या समर्थ नेतृत्वात करण्यात आला.यावेळी या आनंदोत्सव साजरा करताना औसा येथील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष   दत्तात्रय कोळपे, शहराध्यक्ष प्रदीप मोरे,   युवक शहराध्यक्ष रुपेष दुधनकर, कार्याध्यक्ष अमर रड्डे  व गोविंद जाधव, वकील इनामदार,अविनाश टीके, कृष्णा सावळकर, विनायक सुर्यवंशी, मुकेश तोवर, गजानन शिंदे यांसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या