औसा येथे महावीर जयंती उत्साहात साजरी मिरवणूक, जन्म सोहळा महाप्रसाद वाटप.

 औसा येथे महावीर जयंती उत्साहात साजरी मिरवणूक, जन्म सोहळा महाप्रसाद वाटप.



औसा प्रतिनिधी.


 जैन धर्माचे 24वे  तीर्थंकर व अहिंसेचे महान पुजारी भगवान महावीर जयंती महोत्सव सोहळा येथील 1008 श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त रविवारी सकाळी महावीर भगवान यांच्या प्रतिमेची शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये सर्व जैन श्रावक श्राविका मोठ्या संख्येने सामील झाल्या होत्या महिलांनी कुंभ कलश घेऊन नृत्य केले. दुपारी जैन मंदिरात भगवान महावीर यांच्या मूर्तीस अभिषेक करण्यात आला व गुलालाची उधळण करून जन्म कल्याणक पाळणा गायिला.जैन मंदिर समितीचे अध्यक्ष रमेश दुरुगकर नितीन विभुते व राजेंद्र दुरुगकर यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले. दुपारी सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. 

आमदार अभिमन्यू पवार, माजी नगराध्यक्ष किरण उटगे, माजी नगरसेवक सुनील उटगे, गोविंद जाधव, प्राध्यापक शिवमुरगे, अविनाश टिके, संगमेश्वर उटगे,केतन शेटे यांनी मंदिरात महावीर भगवान यांच्या मूर्तीस अभिवादन केले. व समाज बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व जैन समाजाचे बांधव महिला उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या