अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या कार्यकर्त्यांची प्रभाग क्रमांक 6 मध्ये पदयात्रा.
औसा . एम बी मणियार
भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष, आरपीआय आठवले गट आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या महायुतीच्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ औसा शहरातील प्रभाग क्रमांक 6 कालन गल्ली, पटेल बाडा, नरवडे गल्ली, भोई गल्ली येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रभाग निहाय पदयात्रा काढून येत्या 7 मे ला घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे मतदारांना आवाहन करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष डॉ अफसर शेख व भाजप चे नेते तथा उमर फारुख युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष पप्पु भाई शेख यांच्या नेतृत्वाखाली औसा शहरातील प्रभागात पदयात्रा काढून माहितीचा जाहीरनामा आणि उमेदवाराचा वचननामा असलेले पत्रक घरोघरी भेट देऊन महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन कार्यकर्ते करीत आहेत.या पदयात्रेत शहरातील कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन अर्चनाताई पाटील यांचे घड्याळ चिन्ह घराघरापर्यंत पोहोचविण्याचे काम जोमाने सुरू आहे.या पदयात्रेत महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या