औसा येथे रस्ता रुंदीकरणाचा कामाला लागला मुहूर्त.
जामे मस्जिद ते हनुमान मंदीर पर्यंत रस्ता रुंदीकरणाच्या कामाला मालमत्ता धारकांनी केली सुरुवात.
औसा/प्रतिनिधी-
औसा शहरातील जामे मस्जिद ते हनुमान मंदीर पर्यंत चा मुख्य रस्त्यावरील तिसऱ्या टप्प्याच्या रस्ता रुंदीकरणाचे काम अनेक कारणाने मागील अनेक वर्षांपासून रखडले होते.
परंतु या कामाला मुहूर्त लागत नव्हता, अखेर १५ मार्च २०२४ रोजी आ. अभिमन्यू पवार आणि मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्या उपस्थितीमध्ये लातूर वेस हनुमान मंदिराजवळ आयोजित एका कार्यक्रमांमध्ये तिसऱ्या टप्प्याच्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
या परिसरातील रस्ता रुंदीकरण अभावी अनेक छोटे-मोठे अपघात आणि रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत होता. तसेच व्यापाऱ्यांनाही समोर वाहतुकीची कोंडी, वाहने लावल्यामुळे अनेक
अडचणीला सामोरे जावे लागत होते. या सर्व बाबीची दखल घेऊन आमदार आभिमन्यू पवार यांनी १५ मार्च रोजी तिसऱ्या टप्याच्या
रस्ता रुंदीकरणाच्या कामाचा शुभारंभ केला असून आता लातूरवेस हनुमान मंदिरापासून जामा मजिद पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूचे मालमत्ताधारक यांना नोटीस बजावली असल्यामुळे भूसंपादन प्रक्रियेसाठी सर्व मालमत्ता धारकांनी आपल्या जागा सोडण्यासाठी समोरील ठरवून दिलेली जागा रिकामी करण्यासाठी कामाला लागले आहेत.
0 टिप्पण्या