आमदार अभिमन्यू पवारांच्या प्रयत्नातून बेलकुंड - चिंचोली सोन ला २४८ हेक्टरची एमआयडीसी मंजूर.
औसा प्रतिनिधी
औसा आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नाने औसा तालुक्यातील बेलकुंड व सोन चिंचोली परिसरात २५० हेक्टर क्षेत्रावर अतिरिक्त एमआयडीसीला मंजुरी मिळाली असून एमआयडीसीच्या उच्च स्तरीय समितीने प्रस्तावित वरील एमआयडीसीला मंजुरी प्रदान केली असून ग्रामीण भागात उद्योग क्षेत्र सुरू करण्यासाठी हे महत्वाचे तसेच उल्लेखनीय काम मानले जात आहे..
याबाबत माहिती अशी की औसा येथे अतिरिक्त एमआयडीसी निर्मिती सह आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे यासह अनेक विषयावर विधिमंडळात विशेष लक्षवेधी करताना आमदार अभिमन्यू पवारांनी सरकारचे लक्ष
वेधले होते त्या अनुषंगाने १८
डिसेंबर २०२३ रोजी उद्योग मंत्री
विजय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय बेठक घेण्यात आली होती त्या बेठकीत साध्य औसा एमआयडीसीत जागा उपलब्ध नसल्याने अतिरिक्त एमआयडीसी निर्माण करण्यासाठी बेलकुंड सोन चिंचोली भागात जमीन उपलब्ध होऊ शकते या अनुषंगाने उद्योग विभागाने योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी केली होती याबाबत अधिवेशन संपल्या नंतर २२ डिसेंबर २०२३ रोजी एमआयडीसीच्या उपमुख्यकार्यकरी अधिकारी श्रीमती सोनाली मुळे यांनी प्रस्तावित स्थळाला भेट देऊन पाहणी करावी ३० डिसेंबर पर्यंत उच्च स्तरीय समिती समितीकडे याचा अहवाल सादर करावा व तीन महिन्यांत
एमआयडीसीला मान्यता मिळेल अशा पध्दतीने तात्काळ कारवाई करण्याचा सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल्या होत्या या अनुषंगाने श्रीमती सोनाली मूळे यांनी एमआयडीसीचे जनरल मॅनेजर बाप्पासाहेब थोरात, प्रादेशिक अधिकारी यांच्यासह आमदार अभिमन्यू पवार यांनी बेलकुंड व सोन चिंचोली भागातील त्या जमिनीची पाहणी केली होती. याबाबत पाहणी नंतर अतिरिक्त एमआयडीसीकरिता सदरील जागा उपलब्ध अनुकूल असल्याचा अहवाल एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना सादर केला त्यानंतर ५ फेब्रुवारी रोजी प्रधान सचिव (उद्योग तथा अध्यक्ष उच्च अधिकारी समिती) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रस्तावित बेलकुंड येथील खाजगी १७९.०६८६ हैं. आर. व सरकारी ०.१८. हे. आर, सोन चिंचोली खाजगी ६८.५२ हे. आर असे एकूण २४७.७६८६ हे.आर. क्षेत्र या एमआयडीसी करिता स्थापित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ग्रामीण भागात विशेषतः त्या भागात उद्योग निर्मिती करून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून ४० वर्षाच्या इतिहासात एवढे मोठे काम औसाचा लोकप्रतिनिधी म्हणून आमदार अभिमन्यू पवारांच्या माध्यमातून झाली आहे यामुळे औसेकर आनंदित झाले आहेत.
0 टिप्पण्या