डॉ. पल्लवी तायडे यांना प्रथम पारितोषिक
औसा प्रतिनिधी
श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालय हे पुण्यामध्ये पार पडलेल्या १४वे नॅशनल कॉन्फरन्स सायंटिफिकामध्ये एज्युकेशनल पार्टनर होते. या कॉन्फरन्समध्ये लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी लातूर महाविद्यालयातून ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता ,तसेच लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ.पल्लवी तायडे (मेश्राम ) यांनी न्यूरोफिजिओथेरपी सीनियर कॅटेगिरी मधून "इफेक्ट ऑफ प्रोॲक्टिव्ह आणि रिॲक्टिव्ह बॅलेन्स ट्रेनिंग ऑन पोस्टरल इन्स्टाबिलिटी इन पेशंट विथ पार्किन्सन डिसीज " या विषयावर पेपर प्रेझेंटेशन केले आणी प्रथम पारितोषिक मिळावले. डॉ. पल्लवी तायडे (मेश्राम) यांचा आयोजकांकडून गोल्ड मेडल, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्याबद्दल श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे ,सचिव वेताळेश्वर बावगे, कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे, संचालक नंदकिशोर बावगे, प्राचार्य डॉ.वीरेंद्र मेश्राम व सर्व शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या आणि पुढील भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिले.
0 टिप्पण्या