भादा सर्कल मधील विविध गावच्या सरपंचासह अनेकांचा भाजपात जाहीर प्रवेश
लोकसभेसह विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पाठ लावणार - आ. कराड
औसा प्रतिनिधी
औसा:लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील भादा सर्कल मधील भादा, येलोरी, कवठा केज,बऱ्हाणपूर, वडजी, काळमाथा, बोरगाव न. यासह विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, माजी सरपंच उपसरपंच, चेरमन, व्हा चेअरमन,संचालक इतर असंख्य पदाधिकाऱ्यांनी भाजपाचे नेते आ रमेशप्पा कराड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात येणाऱ्या औसा तालुक्यातील मौजे भादा येथे भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा आणि अनेक गावच्या मान्यवरांचा भाजपात जाहीर प्रवेश भाजपाचे नेते आ कराड आणि जिल्ह्याचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी सायंकाळी भादा येथे पार पडला.
यावेळी मोदी आवास योजनेतील घरकुल, अहिल्यादेवी होळकर सिंचन योजनेअंतर्गत विहीर, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पशुधन गोठा यासह विविध योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मंजुरीच्या पत्राचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम शिंदे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव भागवत सोट, प्रदेश भाजपाचे अनिल भिसे सतीश आंबेकर भाजपाचे रेणापूर तालुका अध्यक्ष अॅड दशरथ सरवदे, लातूर तालुकाध्यक्ष बन्सी भिसे, संगायो समितीचे लातूर तालुका अध्यक्ष वैभव सापसोड, रेणापूर तालुका अध्यक्ष वसंत करमुडे, सुधाकर गवळी, उमेश बेद्रे, फुलचंद अंधारे, महादेव मुळे, पद्माकर चिंचोलकर, गुणवंत कारंडे, राजकारण साठे, रवींद्र पाटील, उद्धव काळे, बालाजी साळुंखे, सतीश कात्रे यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती. भादा गावात आगमन होताच आ रमेशप्पा कराड आणि खा सुधाकर शृंगारे यांचे ढोल ताशाच्या गजरात फटाक्याची आतिषबाजी करत जोरदार स्वागत करण्यात आले. या मेळाव्यास भादा आणि परिसरातील अनेक गावच्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
भाजपाच्या मेळाव्यात भादा येथील सरपंच मीनाताई दरेकर, उपसरपंच बालाजी शिंदे, माजी सरपंच दिनकर माळी, पांडुरंग कात्रे, माजी चेअरमन नंदकुमार जाधव, महादेव पाटील, येलोरी येथील सरपंच धोंडीराम लखादिवे, उपसरपंच सोमेश्वर येरटे, सागर पाटील, बसवेश्वर बिराजदार, नितीन रिंगणकर, कवठा - केज येथील सरपंच गिरीधर पवार, उपसरपंच अरुण व्हादाडे, माजी सरपंच दत्तू गोरे, तंटामुक्ती अध्यक्ष अण्णासाहेब व्हादाडे, बापूबिरू वाटेगावकर प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष प्रशांत गोरे, विश्वनाथ गुट्टे, पांडुरंग गोरे, श्रीकांत जाधव, मंगलबाई गोरे, रंजना आघाव, ब्रहानपूर येथील सरपंच अनिल मोरे, तंटामुक्ती अध्यक्ष रामानंद स्वामी, व्हा. चेअरमन गुरुलिंग ढगे, माजी सरपंच पांडुरंग उबाळे, परमेश्वर मिटकरी, बळी कांबळे, सतीश चव्हाण, वडजीचे सरपंच महादेव गुरुशेट्टी, उपसरपंच शेख अकबर हैदर, उमराव शेख, जिलानी नवाज, शब्बीर आलम, हमजा पठाण, शहाबुद्दीन शेख, रजाक शेख, मुस्तफा शेख, अन्सार शेख, बाबा मिया शेख, काळमाथा उपसरपंच श्यामकिरण शेळके, माजी सरपंच मधुकर घाटूळे, सोपान शेळके, बालाजी कांबळे, तात्याराव गायकवाड, विश्वनाथ अडसुळे, अविनाश पाटील, बोरगाव - नकुलेश्वर येथील डॉ व्यंकट रसाळ, व्हाईस चेअरमन संग्राम जाधव, माजी सरपंच वामन अवचार, बाळासाहेब कटारे, पंडित पाटील, विजयनंद साळुंखे, नानासाहेब रोंगे, सोमनाथ उबाळे, आंदोरा येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष शिकूर पठाण, पाशा पठाण, सोहेल पठाण, फरीद शेख, सलीम पठाण, वाजिद पटेल, धनराज जावळे, सलमान पठाण, अल्लू पठाण यांच्यासह त्या त्या गावातील ग्रामपंचायत सोसायटीचे सदस्य विविध लोकप्रतिनिधी व काँग्रेस इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांसह अनेकांनी भारतीय जनता पार्टी जाहीर प्रवेश केला.
खरा विकास कोण करू शकतो याची खात्री पटल्याने अनेक जण भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहेत ज्या विश्वासाने भादा सर्कल मधील अनेकांनी प्रवेश केला त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही असे सांगून आ रमेशप्पा कराड म्हणाले की, या भागातील गावागावात वाडी वस्तीत शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून विकास कामांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला यापुढील काळातही जनहिताची कामे सांगा निश्चितपणे केली जातील मला काही घरचे सोयाबीन विकून करायचे नाही तर तुमचा अधिकार तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. गेल्या पंधरा वर्षात काँग्रेस आमदारांनी या भागात किती कामे केली त्याहून अधिक कितीतरी पटीने मी गेल्या तीन वर्षात विकासाची कामे केली. जनतेची दिशाभूल करून विकास कामाचे श्रेय लाटण्याचा केविलवाणी प्रयत्न लातूर ग्रामीणच्या आमदाराकडून होत असल्याचे सांगून या पुढील काळात दबावाचे आणि आडवणूकीचे राजकारण खपवून घेतले जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. आपल्या गावाच्या परिसराच्या आणि देशाच्या हितासाठी लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठे समर्थन द्यावे मोदीजींना आशीर्वाद द्यावे असेही आव्हान आ रमेशप्पा कराड यांनी यावेळी केले
केंद्रातील मोदीजींचे आणि राज्यातील महायुतीचे शासन सर्वसामान्य माणसाचा विचार करणारे आणि गोरगरिबांना दिलासा देणारे शासन आहे असे बोलून अनेक योजना गरजू लाभार्थ्यांना देण्याचे काम होत असल्याचे सांगून
याप्रसंगी खा सुधाकर शृंगारे यांनी गेल्या 70 वर्षात काँग्रेसला जे जमले नाही ते 10 वर्षात मोदींनी करून दाखविले असे सांगून केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. देश हितासाठी आणि सर्वांगीण प्रगतीसाठी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोदीजींना भरभरून आशीर्वाद द्यावे असे आवाहन केले. भाजपात प्रवेश केलेले भादा येथील उपसरपंच बालाजी शिंदे भाजपाचे विक्रम शिंदे, राजकरण साठे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेवणसिद्ध पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले. शेवटी पद्माकर चिंचोलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यकर्ता मेळावां यशस्वी करण्यासाठी प्रमुख भूमिकेत असलेली बालाजी सेना म्हणून युवा मोर्चाचे औसा तालुका उपाध्यक्ष,ग्रामपंचायत सदस्य योगेश लटुरे, तानाजी गायकवाड,आणि सतीश कात्रे, संजय बनसोडे,पांडुरंग उर्फ गोरख बनसोडे,वग्रसेन घोडके आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या