पालकांनी मुलांच्या कलागुणांला प्रोत्साहन देण्यात आनंद मानावा- सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर.
औसा प्रतिनिधी
शालेय विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण घेत असताना शिक्षणाबरोबरच विविध कलागुणांचा समावेश झालेला असतो आपल्या पाल्यांच्या कलागुणाला प्रोत्साहन देऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगती सोबतच सांस्कृतिक क्षेत्रातील कलागुणांची उपासना होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या मुलांच्या कलागुणाला प्रोत्साहन देत आनंद घ्यावा असे प्रतिपादन पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष सद्गुरु गहिनीनाथ महाराज यांनी केले. औसा येथील आरंभ प्री प्रायमरी स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात ते बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी, स्टीम एज्युकेशन सोसायटी लातूरचे संस्थापक ओम प्रकाश झुरळे, शिवप्रयाग बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष शिवलिंग आप्पा सिंदुरे, जगदीश स्वामी, वैजनाथ सिंदुरे, वीरभद्र सिंदुरे, सौ. शिवलीला वैजनाथ सिंदुरे आदी मान्यवर उपस्थित होते. आरंभ प्री. प्रायमरी स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विद्यार्थी विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीते लोकगीत तसेच देवी-देवतांच्या गीता सह विविध गीतांच्या तालावर उत्कृष्ट नृत्याविस्तार करून श्रोत्यांचे मने जिंकली. आरंभ प्री. प्रायमरी स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी शहरातील शिक्षण प्रेमी नागरिक तसेच माता-पिता पालक व निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या