एमआयडीसी मंजूरीबद्दल आ. अभिमन्यू पवारांचा नागरि सत्कार.
...
औसा प्रतिनिधी
औसा - औसा तालुक्यात औद्योगिक विकासातून उद्योग व रोजगार निर्मिती होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे काम बेलकुंड - चिंचोली सोन एमआयडीसी मंजूर करून केल्याबद्दल आमदार अभिमन्यू पवार यांचा (दि.११) रोजी बेलकुंड (ता.औसा) येथे बेलकुंड, चिंचोली सोन व तालुक्यातील ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरि सत्कार करण्यात आला.
उद्योग उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी अनेक उद्योजकांनी आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडे केली होती. मात्र औसा एमआयडीसीमध्ये जागा उपलब्ध नसल्याने अतिरिक्त एमआयडीसी मंजूरीसाठी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती.याबाबत फडणवीस यांनी उदय सामंत यांना यासंदर्भात सूचना दिल्यानंतर काही दिवसातच या सर्व प्रकिया जलदगतीने होत बेलकुंड - चिंचोली सोन येथे २४७ हेक्टरची एमआयडीसीला मंजूरी मिळाली.अल्पावधीतच एमआयडीसीला मंजुरी मिळाल्याबद्दल या भागातील ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने रविवारी आमदार अभिमन्यू पवार यांचा भव्य नागरि सत्कार करण्यात आला.याप्रसंगी मंचावर बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे, संगायो समितीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब मोरे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रा सुधीर पोतदार,संत मारुती महाराज साखर कारखान्याचे संचालक रमेश वळके, भाजपचे तालुका सरचिटणीस प्रवीण कोपरकर, किल्लारी कारखान्याचे माजी संचालक युवराज बिराजदार, बेलकुंड सरपंच विष्णू कोळी, चिंचोली सोन सरपंच उदयसिंह देशमुख,संजय कुलकर्णी, सरपंच संतोष गोरे, आदीसह नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या