संजय माळी यांचे निधन.

 संजय माळी यांचे निधन.



औसा प्रतिनिधी


 भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष  दिवंगत संजय व्यंकटराव माळी वय 48 वर्ष यांचे सोमवार दिनांक 8 जानेवारी 2023 रोजी अल्पशा आजाराने नांदेड येथे उपचार सुरू असताना खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले. दिवंगत संजय माळी हे नगरसेविका लक्ष्मीबाई व्यंकटराव माळी यांचे सुपुत्र तर माजी उपनगराध्यक्ष दिगंबर हरिभाऊ माळी यांचे पुतणे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली, एक मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार दिनांक 9 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता औसा येथील माळी समाजाच्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या