शौचालयाचे घाण पाणी त्वरित बंद करा. एमआयएम च्या वतीने मुख्याधिकारींना निवेदन.

 शौचालयाचे घाण पाणी त्वरित बंद करा. एमआयएम च्या वतीने मुख्याधिकारींना निवेदन.





औसा प्रतिनिधी


निलंगा वेस ते बाजार समिती रस्त्यावर बाजार समितीतील सोडलेले शौचालयाचे घाण पाणी त्वरीत बंद करून रस्ता स्वच्छ करा अशी मागणी एमआयएम च्या वतीने मुख्याधिकारी कडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात कळविण्यात आले आहे की,औसा 

 कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेले शौचालयाचे घाण पाणी हे लगतच्या निलंगा वेस समोरील रस्त्यावर अनेक दिवसापासून सोडण्यात आले असून त्यामुळे रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरीकांना याचा त्रास होत आहे. या रस्त्यावर शाळेला जाणारी मुले, वयोवृध्द नागरीक, शेतकरी लोक, तसेच याच रस्त्यावर असलेले येलम समाज, कैकाडी समाज, गवंडी समाज स्मशानभूमी तसेच महेदविया कब्रस्तान व लंगरपट्टी कब्रस्तान तसेच जनावरांबाजार असून या मुळे सदर लोकांना त्रास होत आहे. आपण दोन्ही कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी या रस्त्यावर ये जा करतात परंतु याकडे आपण जाणून बुजुन दुर्लक्ष करीत आहात काय ?

असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला आहे.

तरी कृषि उत्पन्न बाजार समिती व पालिका प्रशासनाने सदरील घाण पाणी त्वरीत बंद करुन रस्ता स्वच्छ करण्यात यावा. यावर केलेल्या कार्यवाहीची प्रत देण्यात यावी.अशी  मागणीही  एमआयएम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी  दिनांक 8 जानेवारी रोजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी या निवेदनावर सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांची स्वाक्षरी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या