ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने औसा येथे सर्व रोग निदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद
औसा प्रतिनिधी
जेष्ठ नागरिक संघ औसा कालिकादेवी जेष्ठ महिला नागरिक संघ ज्ञानवर्धिनी ज्येष्ठ नागरिक महिला संघ आणि मुक्तेश्वर जेष्ठ नागरिक संघाच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा शल्य चिकित्सक आणि ग्रामीण रुग्णालय औसा यांच्या सहकार्याने श्री मुक्तेश्वर मंगल कार्यालय औसा येथे सर्व रोग निदान शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले होते.शिबिराचे उद्घाटन प्रजापिता ईश्वरीय ब्राह्मकुमारी विश्र्व विद्यालय औसा केंद्राच्या संचालिका राजयोगिनी सुरेखा बहिणजी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रदीप ढेले ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनिता पाटील देवणीकर रणदिवे सचिन डॉक फडणीस नळगुंडे व जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी यांनी अतिशय उत्कृष्टरित्या आरोग्य शिबिराचे आयोजन करून रक्तदाब ईसीजी, किडनी लिव्हर, डोळे, तोंडाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, पिशवीचा कॅन्सर, प्रोस्टेट ग्रंथी इत्यादीच्या तपासणी केली 170 रुग्णाची मोफत तपासणी या शिबिरामध्ये करण्यात आली शिबिराच्या यशस्वीतीसाठी मुक्तेश्वर देवालय न्यासचे अध्यक्ष ऍड मुक्तेश्वर वाघदरे, धनंजय कोपरे, प्रकाश वाघमारे, लक्ष्मीकांत कुलकर्णी, सदाशिव तिडके, विजयसिंह चव्हाण, वीरभद्र कोपरे, सौ सरोजनी कटारे, भारतबाई औटी, महानंदा मिटकरी, शोभा भोजने, छाया कुलकर्णी, लता येळेकर लता दीक्षित, शकुंतला पोतदार यांनी विशेष परिश्रम घेतले. ज्ञानवर्धिनी महिला जेष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष सौ महानंदा कोपरे व त्यांच्या सहकार्याने शिबिरामध्ये नोंदणी व उपस्थित रुग्णांना चहा नाष्टाची उत्तम व्यवस्था केली होती.
0 टिप्पण्या