औसा येथे नोंदणीकृत वारकरी व वृद्ध कलावंताचा सन्मान सोहळा .

 औसा येथे नोंदणीकृत वारकरी व वृद्ध कलावंताचा सन्मान सोहळा.


 


औसा प्रतिनिधी 


अखिल भारतीय नोंदणीकृत वारकरी मंडळ औसा तालुका आणि पंचायत समिती औसा यांच्या संयुक्त विद्यमाने औसा तालुक्यातील नोंदणीकृत वारकरी व वृद्ध कलावंतांचा सन्मान सोहळा आमदार अभिमन्यू पवार यांच्या शुभहस्ते आणि फुलचंद अंधारे अध्यक्ष वृद्ध कलावंत मानधन निवड समिती जिल्हा परिषद लातूर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 4:30 वाजता पंचायत समिती औसा येथे आयोजित करण्यात आला आहे.

 या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार भरत सूर्यवंशी, गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे, सहाय्यक गटविकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. तसेच ईश्वर गुरुजी,सुनील शेळकर, माधव माने आणि अभिमन्यू मोहिते यांचे भावगीत व भक्तीगीतेचा कार्यक्रम आणि गौस पाशा मुल्ला यांचा कव्वाली कार्यक्रम होणार आहे.

 तरी तालुक्यातील नोंदणीकृत वारकरी व वृद्ध कलावंतांनी या कार्यक्रमास सहभागी व्हावे असे आवाहन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे तालुका अध्यक्ष खंडू महाराज लटूरे,गोविंद तावसे, सतीश जाधव ,गोरोबा कुरे सिद्धराम राजट्टे, दिनकर निकम यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या