औसा वकील मंडळाने केला राहुरी येथील घटनेचा निषेध अधिवक्ता संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी.

 औसा वकील मंडळाने केला राहुरी येथील घटनेचा निषेध अधिवक्ता संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी.



औसा प्रतिनिधी 


औसा .


विधीज्ञ दांपत्याची निर्घृण हत्येच्या निषेधार्थ अधिवक्ता संरक्षण कायदा मंजूर करून लवकरात लवकर संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी औसा येथील विधीज्ञ मंडळाच्या वतीने औसा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.त्या निवेदनात  असे  नमूद केले आहे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील अँडव्होकेट राजाराम जयवंतराव आढाव व त्यांची पत्नी अँडव्होकेट मनिषा राजाराम आढाव यांची अमानुष हत्या करण्यात आली.यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरले असून राज्यभरात न्यायालयात अधिवक्ता म्हणून काम करणाऱ्या भाऊबंद मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.सदरचे अमानुष हत्याकांड पाहता वकिलांच्या जिवीता विषयी व त्यांच्या कुटुंबीयां विषयी भयप्रद स्थिती व भविष्य अंधकारमय प्रतित होत आहे. मागिल काही वर्षांत राज्यभरात यासम अनेक घटना घडल्या असून त्यावर प्रतिबंध करण्यासाठी अधिवक्त्यांना कायद्याचे संरक्षण मिळणे अगत्याचे ठरते तरी मुख्यमंत्री यांनी इतर राज्यांच्या धर्तीवर आपल्या राज्यात सुद्धा अधिवक्ता संरक्षण कायदा मंजूर करून तातडीने कायदा लागू करण्याची कार्यवाही करावी.अशी मागणी विधिज्ञ मंडळ औसा तालुक्याच्या वतीने 29 जानेवारी सोमवार रोजी  औसा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी   औसा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अडव्होकेट फेरोजखान पठाण, अँडव्होकेट शाहनवाज पटेल, अँडव्होकेट राजू पटेल, अँडव्होकेट परमेश्वर नाईकवाडे, अँडव्होकेट दत्ता घोगरे, अँडव्होकेट विशाल वाघमारे, अँडव्होकेट हर्षद जाधव, आदी वकील बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या